Syllabus    FYBA Syllabus

                             SYBA Syllabus Old 

                             TYBA Syllabus Old

                             SYBA Syllabus 2020 Pat New

                             TYBA Syllabus Sem Patt. New

 

 Course Otcomes

 

  1. मराठी विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल.
  2. मातृभाषेतून निर्मित झालेल्या साहित्याचे सखोल ज्ञान प्राप्त होईल.
  3. मराठी साहित्यातून विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोण मिळेल.
  4. मराठीतील भाषिक कौशल्य आत्मसात केल्याने ते समजातील घटकाशी प्रभावीपणे संवाद साधू शकतील.
  5. मराठी साहित्य व संस्कृती यांचा मेळ घालून त्याविषयी समाजघटकाशी विद्यार्थी संवाद साधू शकतील.
  6. मराठी भाषेच्या सर्वकष ज्ञानामुळे साहित्य व संस्कृती या विषयीच्या संशोधनामध्ये प्रभावीपणे वापर करू शकतील.
  7. वेगवेगळ्या साहित्य प्रकारचा अभ्यास करून त्यातून समजाविषयी ज्ञान अवगत करू शकतील.
  8. साहित्यातून आत्मसात केलेली नीतीतत्त्वे यांचा वैयक्तिक जीवन संघटन यामध्ये प्रभावीपणे वापर करतील.
  9. मराठी साहित्यातून विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोण मिळेल.

 

  1. साहित्याचे विश्लेषण करता येईल.
  2. साहित्याची समीक्षा करता येईल.                                                   

FYBA-G-1 (1027) आधुनिक मराठी साहित्य आणि उपयोजित मराठी

  1. मराठी भाषा, मराठी साहित्य व तिची उपयोजितता यांची ओळख होईल.
  2. विद्यार्थ्यामध्ये आस्वाद घेण्याची क्षमता वाढेल.
  3. विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन अभिरूचीचा विकास होईल व त्या विषयी स्पष्टीकरण देता येईल.
  4. व्यक्तिमत्त्व विकसामध्ये भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सांगू शकतील.
  5. भाषिक कौशल्ये आत्मसात करता येतील व त्यांची महती त्यांना स्पष्ट करता येईल. विविध भाषिक कौशल्याचा उपयोग व्यवहारामध्ये करता येईल.
  6. साहित्याच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना जीवन विषयक, समाजाविषयी विश्लेषण करता येईल.
  7. विविध साहित्य प्रकारांचे विद्यार्थ्यांना विवेचन करता येईल.
  8. कार्यक्रम संयोजन कसे करावे याविषयी विद्यार्थी चर्चा करू शकतील.

 

   SYBA –G2(2027) आधुनिक मराठी साहित्य आणि उपयोजित मराठी

  1. चरित्र आत्मचरित्र संकल्पना स्पष्ट होतील.
  2. पारिभाषिक संज्ञाची ओळख होईल.
  3. लेखन विषयक नियम स्पष्ट होऊन लेखनात त्याचा वापर करता येईल.
  4. विविध अर्जाच्या प्रकारातील अर्ज लिहिता येईल.
  5. सारांश लेखन करता येईल.
  6. चरित्र-आत्मचरित्र वङ्मयाचा मराठी साहित्यातील वाटचालीचा आढावा घेता येईल.
  7. चरित्र-आत्मचरित्र यातील घटक त्यांचे वेगळेपण यांचे विवेचन करता येईल.

   SYBA S1(2028) मराठी साहित्यातील विविध साहित्यप्रकार

  1. मराठी साहित्यातील साहित्यप्रकारांविषयी विद्यार्थ्यांना माहिती होईल.
  2. मराठी साहित्यप्रकारांचे तात्त्विक घटकांचे ज्ञान देणे.
  3. साहित्यकृतीला मुक्त प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे.
  4. साहित्य लेखनाबाबत त्यांना माहिती देता येईल व त्यावर ते चर्चा करू शकतील.
  5. नाटक व कादंबरी या साहित्य प्रकारांच्या तात्त्विक घटकांचे ते उदाहरणांसह स्पष्टीकरण देऊ शकतील.
  6. साहित्यकृतीचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करण्याची दृष्टी निर्माण करणे.
  7. नाटकातील विविध घटकांचे ते विश्लेषण करतील.
  8. कादंबरीतील विविध घटकांचे स्पष्टीकरण करू शकतील.
  9. साहित्यकृतीला मुक्त प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होईल .
  10. 10. साहित्याचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता वाढीस लागून साहित्याचे वर्गीकरण       त्यांना करता येईल.
  11. 11. पदव्युत्तर अभ्यास करण्याची पूर्वतयारी करणे.
  12. 12. साहित्याचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास करण्याची क्षमता विकसित होईल.

SYBA-S2 (2029) अर्वाचीन मराठी वङ्मयाचा इतिहास (1818 ते 1960)

  1. मराठी साहित्याच्या ऐतिहासिक परंपरेचे स्थूल ज्ञान होईल.
  2. साहित्य निर्मितीमागील प्रेरणा, प्रवृत्तीचे ज्ञान होईल.
  3. वाङ्मयाच्या इतिहासाची ओळख होईल.
  4. वाङ्मयाच्या अभ्यासामुळे वाङ्मयामध्ये झालेली विविध स्थित्यंतरे ते विशद करू शकतील.
  5. वाङ्मयाच्या अभ्यासाच्या नव्या दिशांवर ते चर्चा करू शकतील.
  6. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे त्यांच्या लक्षात येतील.
  7. इतिहास लेखनाच्या प्रेरणांवर ते स्पष्टीकरण देऊ शकतील.
  8. वाङ्मयाचा आस्वाद घेऊन त्याचे वर्गीकरण ते करू शकतील.

TYBA G-3 (3027) आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी

  1. निबंध वाङ्मय प्रकाराची व्याख्या करता येईल.
  2. निबंधाचे विविध प्रकारात वर्गीकरण करता येईल.
  3. प्रवासवर्णन वाङ्मय प्रकाराची माहिती सांगता येईल.
  4. निबंध व प्रवासवर्णन यांच्या साहित्य परंपरेचा स्थूल परिचय होईल.
  5. विद्यार्थ्यांची वाचन व लेखन क्षमता विकसित होईल.
  6. ग्रंथपरीक्षणाची आवड निर्माण होईल.
  7. भाषेचे यथोचित आकलन करण्याची क्षमता विकसित होईल.
  8. साहित्याबद्दलची अभिरूची विकसित होऊन कलाकृतीचा आस्वाद घेण्याची क्षमता वाढेल.
  9. विविध वाङ्मय प्रकारातील ग्रंथाचे परीक्षण करू शकतील.
  10. प्रवास वर्णनात्मक लेखाचे मूल्यमापन करता येईल.

TYBA S3 (3028) साहित्यविचार

  1. भारतीय व पाश्चिमात्य साहित्य विचाराची विद्यार्थ्यांना ओळख होईल.
  2. साहित्याचे स्वरूप समजून घेता येईल.
  3. साहित्याची प्रयोजने स्पष्ट करता येतील.
  4. साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी चर्चा करू शकतील.
  5. साहित्याची भाषा समजावून घेता येईल.
  6. भामह, दन्डी, वामन, रुद्रट, भरत, अभिनवगुप्ता या संस्कृत मीमांसकांचा परिचय होईल.
  7. साहित्य आणि समाज यातील परस्परसंबंध समजतील.
  8. वाङ्मयीन मूल्ये समजतील.
  9. पाश्चिमात्य विचारवंत जॉन्सन, अर्नोल्ड, इ. च्या विचारांचे टिकात्मक परीक्षण करू शकतील.

10.साहित्य प्रकाराची संकल्पना समजून घेता येईल.

 

TYBA S4 – (3029) भाषाविज्ञान

  1. भाषेची व्याख्या करता येईल.
  2. भाषेचे स्वरूप, महत्त्व, कार्य भाषेच्या अभ्यासाची प्रमुख अंगे यांचे विश्लेषण करू शकतील.
  3. भाषा अभ्यासपद्धतीचे विवेचन करू शकतील.
  4. स्वननिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करता येईल.
  5. वागिंद्रियांची रचना स्पष्ट होईल.
  6. स्वर, अर्धस्वर, व्यंजन यांचे वर्गीकरण करता येईल.
  7. ऐतिहासिक भाषाअभ्यासपद्धतीचे स्वरूप लक्षात येईल.
  8. भाषाकुलाची संकल्पना जाणून घेऊन मराठी भाषेच्या उत्पत्तीचा अभ्यास करता येईल.
  9. अर्थ ही संकल्पना व अर्थाचे प्रकार त्यांना विशद करता येतील.
  • भाषाकुल संकल्पनेचे विश्लेषण करू शकतील.

FYBA CBCS  Pattern 2019

FYBA SEM 1 मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास [CC-1A]

  1. कथा या साहित्य प्रकारची ओळख होईल.
  2. कथा या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख होईल.
  3. भाषिक कौशल्यविकासाचे महत्त्व समजेल.
  4. इ.माध्यमांचे ज्ञान अवगत होईल.
  5. समकालीन साहित्याचे विविध पैलू समजतील.

     FYBA SEM 2- मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास [CC-1A]

  1. एकांकिका या साहित्यप्रकाराची ओळख होईल.
  2. एकांकिका या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख होईल.
  3. भाषिक कौशल्यविकासाचे महत्त्व समजेल.
  4. भाषांतर करण्याचे ज्ञान अवगत होईल.
  5. संवाद लेखनाला चालना मिळेल.
  6. कल्पना शक्ती प्रबळ होईल.